https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत नगर परिषदेच्या सफाई विभागाचे दूर्लक्ष; स्वखर्चातुन केली परिसरातील स्वछता.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील प्रवेशद्वारा समोर मागील अनेक दिवसापासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते या संदर्भात नागरिकांनी नगर पालिके कडे तक्रारी करून ही पालिके कडून कोणत्या ही प्रकारे दखल घेतली जात नसल्याने भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष शैलेश वडमारे यांनी स्वखर्चातून परिसरातील स्वच्छता केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मानवत शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील डॉ. आंबेडकर नगर परिसरात प्रवेश करण्याच्या ठिकाणीच मोठया प्रमानात कचरा जमा झाल्याने परिसरात पूर्ण घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे या ठिकाणी आजू बाजूला राहत असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. सद्या पावसाळ्याचे दिवस असून जमा झालेल्या कचऱ्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत होते याबाबत नगरपालिके कडे वारंवार लेखी तक्रारी करुन ही पालिका प्रसासनाने दखल घेतली नसल्याने नागरिकांच्या मागणीची दखल घेत भीमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष शैलेशजी वडमारे यांनी स्वखर्चातून जे. सी. बी. मशीनच्या सहाय्याने येथील परिसराची स्वच्छता केली. यावेळी शैलेशजी वडमारे, राहुल कुंभकर्ण, असद खान, सय्यद मोईज, यांच्या सह यावेळी नागरिक उपस्थित होते स्वच्छते मुळे नागरिकांतुन समाधान व्यक्त होत आहे तर नगर परिषदेच्या प्रशासनाने वेळो वेळी अर्ज करून दखल न घेतल्यामूळे प्रशासना विषयी नागरीकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704