यशवंत ‘ मध्ये महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन

नांदेड: (दि. १४ एप्रिल २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी बोधिसत्व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ. कविता सोनकांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा. राजश्री भोपाळे, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.अभिनंदन इंगोले प्रा. श्रीराम हुलसुरे, प्रा. कांचन गायकवाड, गणेश विनकरे यांनी तसेच डॉ.गौतम दुथडे, डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी महामानवाच्या प्रतिमेला वंदन केले.