पुलिस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण यांचा जयंती मंडळाच्या वतीने सत्कार

पुणे: प्रतिनिधी
14 एप्रिल रोजी जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात, फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथील भीम जयंती महोत्सवात कायदा व सु व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी उपस्थित असलेले पी.एस.आय. राजेंद्र चव्हाण यांचे स्वागत करताना यशवंत महाविद्यालयाचे डॉ. आर. पी. गावंडे मंचावर उपस्थित डॉ. प्रकाश मारुती पवार उप प्राचार्य फर्ग्युसन महाविद्यालय पुणे राज्यशास्त्र विभाग प्रमुख त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉ. रंगारे व जयंती मंडळाचा अध्यक्ष जीवक वाघमारे यांनी केले