ताज्या घडामोडी
नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

मानवत / प्रतिनिधी.
मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाले विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडक यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी जेष्ठ शिक्षक बालाजी गोंटे यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन व पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी एकनाथ मूळे, एस. एन. कच्छवे यांनी बाबासाहेबांच्या जिवन चरित्र्यावर आपले विचार व्यक्त केले.
यावेळी बाबासाहेब तेलभरे पाटील, कैलास अबूज, वैभव होगे, शहा सर पालक राम पंडीतराव दहे पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थीती होती.
*