गडचिरोली,प्रतिनिधी :-
महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले रत्न इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर भारताच्या मातीच्या कना-कनावर आणि विश्वाच्या प्रमाणावर राज्य करणारे श्रीमंत राजे जनतेची मायमाऊली बनुन अन्यायाला चिरडून काढणारे सामान्य व शेतक-यांना स्वाभीमानाने निर्भिडपणे जीवन जगण्याची उर्मी देणारे राजे. शत्रुच्याही माता, बहिनींना मान, सन्मनाने वागवणारे तिच्यात आपली आई बघणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती समस्त सक्षमीरण बहुउद्देशिय विकास संस्थे तर्फे संस्थेसाजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास सी.आर.पी.एफ. कॅम्पचे सैनिक नवनाथ आव्हाड, बी.आर.ओ. इनचार्ज प्रविण अंधारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पाहुण्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, महाराजाच्या नावाच्या गजरात एवढी ताकद आहे की, आम्हाला दुष्मनांसमोर मरणाचीही भीती वाटत नाही. एवढी उर्जा अंगात शत्रुशी सामना करतांना येते असे मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष अॅड. भावना लाकडे यांनी अध्यक्षिय संबोधन केले, संचलन व आभार प्रदर्शन श्रेयस सयाम यांनी केले. या कार्यक्रमात प्रवीना लाडवे यांनी शिवरायांच्या जीवनकार्यावरील गीत सादर केले.
Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.