https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

पोलिस निरिक्षक दीपक दंतूलवार यांच्या पदस्पर्शाने मानवत पोलीस स्टेशनचा‎ कायापालट*

मानवत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांचा स्वच्छता‎ मोहीमेत सक्रीय सहभाग

मानवत / प्रतिनिधी.
मानवत पोलिस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी मानवत पोलिस स्टेशन व परिसराची स्वच्छता मोहीम‎ हाती घेत अवघ्या आठ दिवसांत अख्ख्या‎ पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचारी बांधवांनी पो.स्टेच्या परिसराची साफ सफाई करत कायापालट केला आहे.‎
नूकताच मानवत पो.स्टेच्या पोलिस निरक्षक पदाची सुत्रे पो.नि. दीपक दंतूलवार यांनी हाती घेतली. मानवत पोस्टेचे कर्मचारी बांधव यांच्या आरोग्याची काळजी व दक्षता घेऊन कर्मचारी बांधव यांच्यासाठी व्हाॅली बाॅल खेळाचे मैदान केले. तसेच मानवत पो.स्टे मधिल परिसरात स्वच्छता मोहिम राबवून पोलिस कर्मचारी बांधवांनी सक्रिय सहभाग घेऊन पोलिस ठाणे परिसरात स्वच्छता मोहीम सप्ताह‎ राबवला. मानवत पो.स्टेचे नूतन व कर्तव्यदक्ष पोलिस निरिक्षक आ. दिपक दंतुलवार यांच्या नेतृत्वाखाली *माझे कार्यालय* मोहीम राबवण्यात‎ आली.
पो.नि. दिपक दंतूलवार यांच्या मार्गदर्शनाखाले विविध उपक्रम राबविण्यात येत असून आपण जेथे काम करतो, जेथे राहतो‎ तो परिसर स्वच्छ असावा.
या भावनेने पोलिस‎ ठाण्याचे पो.नि. आ. दिपक दंतुलवार यांनी‎ आपल्या 50 कर्मचाऱ्यांसह गेल्या 08 दिवसांपासून मानवत पोलिस स्टेशनच्या आवारातील‎ काटेरी बाभळी, अवास्तव वाढलेली झाडे‎ झुडपे, खड्डे बुजवून तेथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत येथील परिसर‎ स्वच्छ व सुंदर बनविला आहे.
शहरात रात्रीची गस्त घालून‎ जागरण झालेले पोलिस बांधव सकाळी सात‎ वाजता सफाईच्या कामावर हजर होतात.‎ कुदळ,खोरे कुऱ्हाड झाडू हाती घेऊन‎ मानवत पोलिस स्टेशन परिसरातील‎ केर कचरा उचलत आहेत.
पोलिस निरिक्षक दीपक दंतुलवार ळयांच्या‎ पदस्पर्शाने व विविध उपक्रमा मुळे मानवत पोलीस ठाण्याचा‎ कायापालट अवघ्या आठ दिवसात झाल्याचे‎ पाहायला मिळत असल्यामूळे पोलिस कर्मचारी सहकारी बांधवामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704