https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

अवैध रित्या दारूचा बॉटल बाळगल्या प्रकरणी एका विरुद्ध मानवत पो.स्टे मध्ये गुन्हा दाखल

एकूण ३३ हजार ६०० रुपयेचा मुद्देमाल जप्त

मानवत / प्रतिनिधी.

अवैध रित्या दारूचा बॉटल बाळगल्या प्रकरणी एका विरुद्ध मानवत पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ३३ हजार ६०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० वाजता एक इसम नागर जवळाच्या दिसेने मोटार सायकल क्रंमांक . एम. एच.२२ ए. टी. ८७७१ या मोटार सायकल वरून विना परवाना व बेकायदेशीर व आपल्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्यास घेऊन जात असताना कारवाई करण्यात आली.
यात रॉयल स्टॅग दारूचा बॉटल व मोटार सायकल असा एकूण ३३ हजार ६०० रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मानवत पो.स्टेचे पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे यांच्या फिर्यादी वरून कृष्णा विष्णू धोपटे (रा. पोहंडूळ ) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम ६५ ई नुसार मानवत पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास मानवत पो.स्टेचे पोलीस हवालदार चोपडे हे करीत आहेत.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704