https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
महाराष्ट्र

आता शिक्षक पुरस्काराला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलें राज्यशिक्षक  पुरस्कार

गडचिरोली,प्रतिनिधी :-

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने मागील पाच वर्षापासून सुरु असलेल्या लढ्याला यश आले. महाराष्ट्र शासनाने दि. २८/६/२०२२ला शासन निर्णय काढुन राज्य शासनाच्या वतीने शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्य शिक्षक पुरस्काराला आता क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हे नाव दिले आहे.सदरील निर्णयाचे डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयामुळे शिक्षक वर्गात आनंद व्यक्त केला जात आहे.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ,अर्जुन पुरस्कार, छत्रपती शिवाजी पुरस्कार आदी बाबी शासनाच्या लक्षात आणून दिल्या व सदरील राज्य  शिक्षक पुरस्काराला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार हे नाव देणेच योग्य राहील ही मागणी लावून धरली.

        सदरील शासन निर्णयाचे परिषदेचे संस्थापक पप्पू पाटील भोयर,प्रदेशाध्यक्ष (प्रा) लक्ष्मण नेव्हल, प्रदेशाध्यक्ष (मा) प्रदीप सोळुंके, महासचिव सतीश काळे,महासचिव सुनील चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव, राज्यसमन्वयक शामराव लवांडे,शेषराव येलेकर, नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, उपाध्यक्ष शांताराम जळते,शिवब्रिगेडचे सतीश मालेकार,प्रदिप चोरे, देवेंद्र टाले, संजय ईंगळे, सचिन भोयर, नितीन धोरण, राममूर्ती वालशिंगे, प्रा.डाॅ.लीलाधर पाटिल, डॉ.विलास पाटील ,कैलाश राऊत विदर्भ प्रमुख,बंडुभाऊ डाखरे,,विनोद पाटील,,प्रभाकर पराड,राजकिरण चव्हाण,वसंत नेरकर,किर्ती कालमेघ वनकर, चंद्रशेखर कोहळे,शिवशंकर स्वामी ,अविता वाघमारे, के.डी. वाघ,  अनंत मिटकरी,  सुनिल मनवर जिल्हाध्यक्ष, विनोद डाखोरे, रमेश पवार,सादिक पठाण,नरेंद्र हाडके,दत्तात्रय गावंडे,राजु उरकुडे, नितीन ठाकरे , प्रशांत जिन्नेवार ,देवदत्त भोयर, ज्ञानेश्वर गायकवाड,राजकुमार भोयर, राजेंद्र गुघाणे, अखलाखसर, बाळासाहेब सरसमकर, संदिप ठाकरे,संदिप गोहोकार,विजय कदम, विजय ढाले,महादेव ढगे, आशिष खडसे, मधुकर डहाके,गिताताई बेले, पुष्पाताई महल्ले,सुवर्णाताई डोंगरे, सुचिता मासूरकर, मिनाताई काळे, आदींनी स्वागत केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704