ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद कॅम्पस मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिवस साजरा

—————————————–
उदगीर :- येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालय, जय हिंद पब्लिक स्कूल, स्वामी विवेकानंद फार्मसी कॉलेज, स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेज, स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय यांनी संयुक्त विद्यमाने 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी सकाळी 8:40 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी ज्योती स्वामी, फिटनेस ट्रेनर आलिम सर,अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ पवार, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश तोलसरवाड, जय हिंद पब्लिक स्कूलचे प्राचार्य संजय हट्टे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे,फ्लोरेन्स नर्सिंग कॉलेज लातूर चे प्राचार्य नागसेन तारे, जय हिंद ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री, स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेषनारायण जाधव,
जय हिंद पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य सतीश वाघमारे, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर गीतावर एका पेक्षा एक सरस नृत्य सादर केली. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. सुधीर जगताप बोलतांना असे म्हणाले की, भारतीय प्रजासत्ताक दिवस हा आपल्या अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे. आपल्या देशाची जनता हीच सार्वभौम आहे. भारतीय घटनेचे आपल्याला स्वातंत्र्यता,समता,बंधुता,न्याय ही मूल्ये दिली आहेत. यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान संधी व समान अधिकार मिळाले आहेत. आज देश महासत्ता होण्याच्या दिशेनी वाटचाल करीत आहे यात प्रत्येक नागरिकांनी आपले योगदान देणे गरजेचे आहे. शिक्षण ही विकासाची पहिली पायरी आहे. देशातील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध करून दिले तर निश्चित पणे विकासाला गती प्राप्त होईल. याच बरोबर देशाचे हित आणि देशाचा अभिमान कसा वाढेल याकडे आजच्या तरुण पिढीनी लक्ष दिले पाहिजे असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिग्विजय केंद्रे यांनी केले तर आभार सतीश वाघमारे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अमर तांदळे, प्रा. राहुल पुंडगे, महेश कस्तुरे, सूर्यवंशी सोमेश्वर, सादीक शेख, वैभव बिडवे, संदेश गवळे यांनी
परिश्रम घेतले. यावेळी संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सह विद्यार्थी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.