चांगले भविष्य घडविण्यासाठी ध्येय निश्चित करावे – आ. भीमराव केराम
नेसूबो महाविद्यालयात विद्यार्थी वार्षिक महोत्सव बक्षीस वितरण संपन्न

नांदेड(प्रतिनिधी): अभिनव भारत शिक्षण संस्था ही स्वातंत्र्यवीर सावरकर व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या राष्ट्र विचाराने प्रेरित झालेली संस्था आहे. या संस्थेतून अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत. ही शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना सकारात्मक प्रेरणा देते. विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडण्यासाठी ध्येय निश्चित करून वाटचाल करावी आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावेत असे प्रतिपादन किनवट विधानसभेचे आ. भीमराव
केराम यांनी केले.
अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विद्यार्थी वार्षिक महोत्सवाच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री.कैलासचंद्र काला, तर प्रमुख पाहुणे म्हणून, संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवीण साले, विजय येवणकर, संस्थेचे सदस्य, गजाननराव कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार कुलकर्णी, विद्यार्थी वार्षिक महोत्सवाचे प्रभारी डॉ. जीवन मसुरे उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम, डॉ. अर्चना भवानकर, पर्यवेक्षक डॉ. गोपाळ कृष्ण सांगवीकर, डॉ. कमलाकर बाराळीकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्र कुमार यांनी केले, आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल व महाविद्यालयाची यशोगाथा विशद केली. या वेळी बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रवीण साले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कलाक्षेत्राकडे वळून करिअर घडविले पाहिजे. त्याचबरोबर चांगले चरित्र घडविण्यासाठी महामानवांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे ते म्हणाले. भाजपाचे महानगर अध्यक्ष तथा माजी विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, अभिनव भारत शिक्षण संस्था ही विशिष्ट विचाराने प्रेरित असणारी शिक्षण संस्था आहे. या संस्थे मधुन आज घडीला लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. आणि संस्थेचे नावलौकिक केले आहे. अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे म्हणाले की, या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आंतर विद्यापीठ युवक महोत्सवात नावलौकिक मिळवला आहे. पुढे बोलतांना महाविद्यालयाच्या विद्यार्थी शिवराज मुधोळ हा त्याच्या मेहंदीसाठी आज अमेरिकेमध्ये मेहंदी काढण्यासाठी गेला आहे असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सामाजिक भान जपले पाहिजे असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलासचंदजी काला यांनी महाविद्यालय स्तरावर आयोजित केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचा नावलौकिक केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसह वार्षिक महोत्सवात आयोजित केलेल्या वेगवेगळ्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सुरेख अशे सूत्रसंचलन डॉ. संदीप काळे यांनी केले तर आभार विद्यार्थी वार्षिक महोत्सव प्रभारी डॉ. जीवन मसुरे यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. मनीष देशपांडे व डॉ. सौ. मीनाक्षी बांगर यांचा शिक्षण क्षेत्रांत केलेल्या अतुलनीय कार्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.