यशवंत’ मध्ये एक दिवसीय नॅक मानांकन प्रक्रिया कार्यशाळा संपन्न

नांदेड:( दि.७ डिसेंबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात दि. ३ डिसेंबर रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षातर्फे महाराष्ट्र शासनाच्या परिसस्पर्श या योजनेअंतर्गत ९ महाविद्यालयांसाठी नॅक मानांकन प्रक्रियेसंदर्भात एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटन सोहळ्याने झाली.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रारंभी समन्वयिका डॉ.एल.व्ही.पद्माराणी राव यांनी प्रस्तावना केली.
पहिल्या सत्रात विद्यापीठाचे नॅक समन्वयक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी, “नवीन बायनरी मानांकन प्रणाली” या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
तदनंतर प्रश्नोत्तर सत्रात उपस्थितांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी “नॅक मूल्यांकन व मानांकन प्रक्रिया” या विषयावर सखोल चर्चा केली. शेवटी प्रश्नोत्तर सत्राने कार्यशाळेची सांगता झाली.
सूत्रसंचालन प्रा. माधव एस. दुधाटे यांनी केले तर आभार सहसंयोजक डॉ.एस.एल.शिंदे यांनी आभार मानले.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ.एम.एम.व्ही.बेग, ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, डॉ.प्रवीण मिरकुटे, डॉ.अजय मुठे, डॉ.प्रवीण तामसेकर, डॉ. मोहम्मद आमेर, डॉ.संदीप पाईकराव, डॉ. सुभाष जुन्ने, डॉ.कैलास इंगोले, प्रा. भारती सुवर्णकार, डॉ.रमेश चिल्लावार, आदींनी परिश्रम केले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, श्री.गुरु गोविंदसिंहजी पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य विकास कदम, प्रबंधक संदीप पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, राजेश अडबलवार आदींनी सहकार्य केले.



