लोकमत दीपोत्सव:२०२४ अंक प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांना सस्नेह भेट
नांदेड:( दि.४ डिसेंबर २०२४)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे माजी प्र-कुलगुरू तथा श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांना लोकमत दीपोत्सव: २०२४ हा अंक राज्यशास्त्र विभागप्रमुख व प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी सस्नेह भेट दिला आहे.
दिवाळी अंक स्वीकारताना प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांनी महाराष्ट्र व देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले; म्हणून त्यांच्या छायाचित्राच्या साक्षीने अंक स्वीकारण्याचा आनंद काही औरच आहे; अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
यशवंत महाविद्यालयाच्या चौथ्या नॅक मूल्यांकनात ए प्लस ग्रेड मा. प्राचार्यांचे अनमोल मार्गदर्शन व अथक परिश्रमातून प्राप्त झाला आहे. महाविद्यालयातील शैक्षणिक, शिक्षणपूरक व शिक्षणेत्तर उपक्रम सदोदित विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या दिशेने आयोजित करण्याचा त्यांचा मानस स्तुत्य आहे.
महाविद्यालय, प्रशासन व प्रत्येक उपक्रम विद्यार्थीकेंद्रित असावा; ह्या त्यांच्या स्वभावामुळे महाविद्यालय विविध क्षेत्रात उत्तुंग झेप घेत आहे. हाडाने, स्वभावाने, मनाने व वृत्तीने शिक्षक असलेले प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी आपले संपूर्ण जीवन शिक्षण क्षेत्राप्रति समर्पित केले आहे.