यशवंत ‘ मध्ये दुग्धशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय दुग्ध दिन संपन्न
नांदेड:( दि.२ डिसेंबर २०२४)
यशवंत महाविद्यालयात माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार दुग्धशास्त्र विभागात राष्ट्रीय दुग्ध दिनानिमित्त ‘दूध व दुग्धजन्य पदार्थ’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ.राजकुमार सोनवणे यांनी भूषविले.
अध्यक्षीय समारोपात त्यांनी डॉ. वर्गीस कुरियन यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
प्रमुख पाहुणे छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील दुग्धशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व विवेकानंद महाविद्यालयातील दुग्धशास्त्र विभागप्रमुख डॉ.वसंत नीरस आणि आदर्श महाविद्यालय, हिंगोली येथील दुग्धशास्त्र विषयाचे प्रा.दिनकर पवार उपस्थित होते.
प्रारंभी डॉ.वर्गीस कुरियन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी
डॉ. वसंत नीरस यांनी, दूध व दुग्धजन्य पदार्थ हे मानवी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत, आणि यामध्ये होत असलेली भेसळ; या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रा. दिनकर पवार यांनी, स्वच्छ दूध उत्पादनविषयी माहिती दिली.
प्रा.बाळासाहेब लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रा.स्वास्तिक राठोड यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिषेक देशमुख, वैभव पावडे, निकिता गुंतापले व अंजनाबाई शिंगेवाड यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता आणि कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पद्माराणी राव, प्रबंधक संदीप पाटील,अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.