यशवंत ‘ मध्ये विद्यापीठ हिवाळी परीक्षा सुरळीत सुरू
नांदेड:( दि.३ डिसेंबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या नोव्हेंबर- डिसेंबर हिवाळी:२०२४ परीक्षा माजी प्र-कुलगुरु तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार दि.२६ नोव्हेंबर पासून सुरळीत सुरू आहेत.
परीक्षेचे केंद्रप्रमुख डॉ. शिवराज बोकडे, सहकेंद्रप्रमुख कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालय, उमरी येथील डॉ.डी.डी.कोल्हेकर, श्री.दत्त कला व वाणिज्य महाविद्यालय,, हदगाव येथील डॉ.तुकाराम बोकारे व सहाय्यक केंद्रप्रमुख डॉ.विजय भोसले आहेत.
या परीक्षा केंद्रावर एकूण २० महाविद्यालयातील १७००० विद्यार्थी परीक्षा देत आहेत.
उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील सहकार्य करीत आहेत.
महाविद्यालयाने स्थापन केलेल्या सकाळ सत्रातील अंतर्गत तपासणी पथकात डॉ.रामराज गावंडे, डॉ. सुभाष जुन्ने, प्रा.माधव दुधाटे, प्रा. भारती सुवर्णकार, डॉ.दीप्ती तोटावार, दुपार सत्रातील डॉ.प्रवीण मिरकुटे, डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ.बालाजी भोसले, डॉ. एस. एम.दुर्राणी, प्रा.संगीता चाटी, सकाळ सत्रातील शिक्षकेतर कर्मचारी ओम आळणे, डी. एस. ठाकूर, बी.एस.अंगरोड, व्ही.पी.इंगोले, एन.ए.काकडे, पी.ए.काकडे, एम.आर. कुकुटला, जे.आर.मांजरमकर, दुपारच्या सत्रातील शिक्षकेतर कर्मचारी संतोष धात्रक, एस.डी.मिरेवाड, एस.आर. आलुरवाड, पि.यू.राठोड, एम.एन.इतबारे, के.पी.सावळे, ए.बी.शिंगेवाड, एस.एस. भालके कार्यरत आहे.
अद्यापपर्यंत परीक्षा केंद्रास विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.सूर्यकांत जोगदंड यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे.