ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत मोठी कारवाई जुगारावर छापा मोहीम — 29 जणांना अटक, 16.62 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड :
अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर करडी कारवाई सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून दि. 06 नोव्हेंबर 2025 रोजी, नांदेड ग्रामीण विभागातील मौ. रातोळी शिवार येथील विजय चंद्रराव पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अंदर-बाहर नावाच्या जुगाराच्या ठिकाणी छापा मारण्यात आला.या कारवाईत एकूण 29 आरोपींना ताब्यात घेऊन, नगदी ₹2,68,450, तीन चारचाकी वाहने, एक मोटारसायकल, 26 मोबाईल फोन व जुगार साहित्य असा एकूण ₹16,62,150/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई मा. श्रीमती अर्चना पाटील (अपर पोलीस अधीक्षक, भोकर) व मा. सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली
शाम पानेगावकर (उपविभागीय पोलीस अधिकारी, बिलोली)
आणि त्यांच्यासह पोउपनि. लोखंडे, तोटेवाड, सपोउपनि. सुदाम जाकोरे, पोहेकॉ. भगवान कोत्तापल्ले, पोहेकॉ. मुदेमवार, पोना. पल्लेवाड, पोकॉ. इंगोले, पोकॉ. निम्मलवाड, पोकॉ. अनिल रिंदकवाले, पोकॉ. ममताबादे यांच्या पथकाने केली.आरोपींची नावे कारवाईत अटक करण्यात आलेल्या प्रमुख आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
गजानन चंद्रकांत मोरे, आकाश व्यंकटराव दरेगावे, शिवाजी बाबुराव पाटील, चंद्रकात विश्वंभर पाटोदे, व्यंकट गंगाराम देवकर, व्यंकट पांडुरंग शिंदे, मनोहर शेषेराव जाधव, सायलु रामलु नागशेटवार, धर्मेंद्र गंगाधर दारमवार, धम्मपाल यादवराव कांबळे, गणेश राजू बच्चेवाड, सिध्देश्वर माधवराव घोणसे, आशितोष सुर्यकांत पत्तेवार, शेख सिद्दीकी शेख मैनोदीन, देवीदास प्रभु गोरलावाड, सुरेश किशनराव चोंडेकर, संगमेश्वर ऊर्फ बजरंग राजेश्वर कल्याणी, प्रताप दशरथ रघुवंशी, महेश नागनाथ नागमवार, योगेश रामदास राऊलवान, अदित्य अशोकराव देवडे, बालाजी मल्हारी कोणकेवाड, समीर खययुम शेख, गंगाधर अमृत घायाळे, गजानन श्रीनिवास इंदुरकर, गंगाराम शिवन्ना कांदमवार, राजु उत्तम पवळे, अमजत ताहेरखान पठाण व इरवंत लच्छमन्ना.
गुन्हा दाखल सदर आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे नायगाव येथे संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अधिकाऱ्यांचे कौतुक या यशस्वी कारवाईबद्दल मा. अभिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले असून, पुढेही अशा अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.



