ताज्या घडामोडी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या स्वागताची उपप्राचार्य डॉ.कल्पना कदम यांना मिळाली संधी..!

नांदेड(प्रतिनिधी): भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची प्रत्यक्ष भेट आणि स्वागत करण्याची संधी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ .कल्पना कदम (बेद्रे )यांना मिळाली.
४ सप्टेंबर रोजी नांदेड विमानतळावर राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मु यांचे उदगीर दौऱ्यानिमित्त आगमन झाले होते. यावेळी त्यांच्या भेटीची आणि स्वागताची वेळ वसंतनगर, नांदेड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया साठी दिल्ली येथील राष्ट्रपती भवनातून मिळाली होती.
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मूर्मू यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी विश्वविद्यालयाच्या प्रमुख ब्र.कु.स्वाती दिदी, वनिता,पूजा,मधुरा, बीके राजेंद्र भाई, बीके बलवीर भाई आदी उपस्थित होते.
यावेळी बीके स्वाती दीदी यांनी वसंतनगर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या सेंटरच्या कार्याची माहिती राष्ट्रपती महोदयांना दिली. यावेळी भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची प्रत्यक्ष भेट झाल्याचा खूप मनस्वी आनंद झाला अशा भावना डॉ. कल्पना कदम यांनी व्यक्त केल्या.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.