अखेर पुरात वाहून गेलेल्या कासारखेडा येथील युवकाचा मृतदेह सापडला..!
तीन दिवस महसूल प्रशासन आणि एनडीआरएफ पथकाचे शर्तीचे प्रयत्न

नांदेड(प्रतिनिधी):
२ सप्टेंबर रोजी आसना नदीला आलेल्या पुरात नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथील गंगाधर स्वामी हा युवक वाहून गेला होता.
युवकाला शोधण्यासाठी नांदेड तहसील चे महसूल प्रशासन आणि एनडीआरएफ चे पथकाने तीन दिवस शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते.
अखेर दि,५ सप्टेंबर रोजी नांदेड तालुक्यातील खुरगाव शिवारात गंगाधर गणपती स्वामी वय 35 या युवकाचा मृतदेह आढळून आला.
भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
तहसीलदार संजय वारकड, यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी शिवकुमार स्वामी अनिरुद्ध जोंधळे, तलाठी गोपीनाथ कल्याणकर , यांच्यासह कासारखेडा व पासदगाव येथील तरुणांनी व एनडीआरएफ पथकाने युवकाचा मृतदेह शोधण्यास मदत केली.
मयत गंगाधर स्वामी यांच्या पार्थिव देहावर कासारखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत गंगाधर स्वामी यांच्या कुटुंबीयांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रतिनिधी विश्वनाथ कडेकर यांनी केली आहे.