ताज्या घडामोडी

कोल्हा येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी

शेतकऱ्यांनी केली हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई ची मागणी.

मानवत / प्रतिनिधी.

दिनांक 4 सप्टेंबर रोजी मानवत तालूक्यासह तालुक्यातील कोल्हा येथील कमलबाई विश्वनाथ भिसे, गोविंद आसाराम भिसे, या शेतकऱ्याच्या एक सप्टेंबर रोजी अतिवृष्टी सोयाबीन पिकाची मोठे नुकसान झाले होते त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब आज दिनांक चार सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी 11 वाजता कोणा शिवारामध्ये त्यांनी पाहणी केली त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून मानवत . तालुक्यात नुकसान भरपाई सारखा पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्व शेतकरी नुकसानीस पात्र आहेत. सर्व पंचनामे झाली आहेत. लवकरच तुम्हाला मदत देऊ. असा संवाद शेतकऱ्यांशी धनंजय मुंडेयांनी साधला. मानवत तालुक्यातील कोल्हा, ताडबोरगाव, रामे टाकळी, केकरजवळा चारही मंडळात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या सर्वच मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई दया असे निवेदन शिवसेना मानवत च्या वतीने प्रमोद तारे शिवसेना उपजिल्हाप्रमुख परभणी, धनंजय मुंडे यांना दिले, त्या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नारायणराव भिसे, सरपंच सोजर बाई गायकवाड, उपसरपंच ज्ञानेश्वर भिसे, तालुका प्रमुख शिवाजी वरखडे,दत्ता गवळी, नारायण नाना भिसे,रामचंद्र गायकवाड, केशव मानवतकर, गोविंद पोळ, भारत तारे,राजेभाऊ भिसे,, सोपान भिसे, माऊली मुळे, आदी शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत. तसेच सावळी, नील वर्ण टाकळी, आटोळा, सोमठाणा, कोथाळा, सावंगी, इरळत नरळद, ताडबोरगाव, कोल्हावाडी आदी गावचे शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते, मार्केट कमिटीचे सभापती पंकज आंबेगावकर, संचालक सुरज काकडे, गोपाळराव भिसे, अंबादास तूप समुद्रे, नामदेव काळे, गोपाळ काळे,अशोक कचरे, मुकुंद मगर,कल्याण देशमुख रमेश देशमुख, माऊली काजळे,अबादास तूपसमूद्रे ,मुंजा तिथे, रमेश तूपसमुद्रे , अनिल तूपसमुद्रे, नवनाथ तिथे, संतोष तूपसमुद्रे, आदीसह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.