अतिवृष्टीत सापडलेल्या सर्व शेतकर्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रूपये अनूदान द्या ; मनसेची मागणी.*
L
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या शेत पिकाच्या नूकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई व पिकविम्याचे वाटप करा अशी मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष काकडे यांच्या मार्ग दर्शनाखाले करण्यात आली.
मानवत तालूक्यात मागील तीन ते चार दिवसापासून मानवत तालुक्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश्य पाऊस पडून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके वाहुन जाऊन शेतक-यांचे शेती पिकांचे खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच ओढ्या नाल्याला पुर आल्यामुळे शेती उपयोगी साहित्य, गुरे, जनावरे व वाहने वाहून जाऊन देखील खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
मानवत तहसिलच्या महसूल प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करुन मानवत तालुक्यातील सर्व शेतक-यांना सरसकट एकरी 50000/- पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी तसेच पिक विमा कंपनीस पंचनामे करण्याबाबत आदेशीत करुन मानवत तालुक्यातील सर्व शेतक-यांना पिकविमा मंजुर करावा अशी मागणी पक्षाच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारेमहाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जिल्हाऊपाध्यक्ष महादेव काकडे , दत्तराव शिंदे पाटील, मदन लाडाणे, रंगनाथ शिंदे, आण्णा मगर, माऊली दहे, बालाजी पौळ, विठ्ठल घाटूळ , आकाश ढगे, बालासाहेब काकडे, रामदास काकडे, विष्णू काकडे, संतोष कूर्हाडे, सूनिल तांबोळी, गणेश काकडे आदी मनसेचे पदाधिकारी यांनी मागणी केली.