ताज्या घडामोडी

गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्याहस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन

*

*

मानवत येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेमध्ये तालुकास्तरीय, ग्रंथप्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये मानवत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. मनोज चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, मानवत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने ग्रंथप्रदर्शन सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेमध्ये करण्यात आले होते. या वेळी गटशिक्षणाधिकारी मा. मनोज चव्हाण यांच्याहस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
मानवत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन सोहळा येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेमध्ये मोठया उत्साहात सम्पन्न झाले.
यावेळी,ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन, मानवत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, मनोज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती शालेय व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष मोहनराव लाड, सावरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख ओमप्रकाश मुळे , शाळेचे मुख्याध्यापक घाटुळ यांची उपस्थिती होती. यावेळी रामराव सोळंके , पानझाडे सर, यांनी शाळेच्या लेझीम पथकाद्वारे,उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी आलेल्या तालूक्यातील इतर शाळेतील विद्यार्थ्यांनी,पुस्तक प्रदर्शन पाहिले, सदरील प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी, गटसाधन केंद्र , कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी या वेळी परिश्रम घेतले.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.