नागरजवळा ते रेणापूर* शेत शिवार रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकर्या मधून समाधान
मानवत / प्रतिनिधी.
मौजे नागरजवळा ते रेणापुर शेत रस्ता माजी आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब यांनी स्वखर्चातून तयार करून दिल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून चा शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न मिटला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून शेतकऱ्यांना आपला शेतमाल शेतातून घरी आणण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागत होती. सहा सहा महिने माल शेतात पडून राहत होता. परंतु त्या भागातील गूलशेर मामा यांच्या प्रत्नातून व गणेश कच्छवे, सदाशिवराव होगे, बाबूराव होगे, राजेश होगे, शंकर होगे, बाबा होगे, प्रकाश होगे, बाजीराव होगे, नारायण होगे, ज्ञानेश्वर होगे, बाबूराव होगे, भागवत होगे,विठ्ठल होगे,बाबासाहेब होगे, माऊली होगे, दिपक होगे, बबलू होगे, हनूमान होगे, नारायण होगे, किशन होगे, मदन होगे, आदी शेतकऱ्यांची मागणी मान्य करून साहेबांनी रस्ता तयार करून दिल्यामुळे शेतकऱ्यांचा श्वास मोकळा झाला आहे. यापूर्वी मा. आमदार बाबाजाणी दूर्राणी यांनी पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत तालूक्यातील अनेक गावाचे मोठ्या प्रमाणात शेत रस्ते तयार करून दिले असून निश्चितच येणार्या आगामी काळात आमच्या सह मतदार संघातील सर्व शेतकरी दूर्राणी यांच्या पाठीशी खंबीरपणे
ऊभे राहू असे मत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
*