ताज्या घडामोडी

गटसाधन केंद्रात विविध शैक्षणिक कार्यक्रम संपन्न

मानवत /mcr news*

मानवत तालुकास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाटयोत्सव 2024-25 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे . दिनांक 08 आगस्ट रोजी गट साधन केंद्रा मध्ये राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव कार्यक्रम घेण्यात आला.
राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सवृ मा. गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केंद्रप्रमुख मा. श्री, प्रकाश मोहकरे , उमाकांत हाडुळे , ओम मुळे व विलास लांडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे निरिक्षण करण्यात आले. यावेळी पंच परीक्षक मा. श्री अवचट जी एस . श्रीमती कामठेकर व्हि. डी .श्रीमती दाभाडे व्ही.एफ.यांनी स्पर्धेचे गुणांकन उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. या वेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे जाहिर करण्यात आला. या वेळी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय शाळेचा विज्ञान नाट्य चमू – प्रथम क्रमांक तर जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय या शाळेचा विज्ञान नाट्य चमू.-द्वितीय क्रमांक तसेच जी.प.मा.शाळा इरळद या शाळेचा विज्ञान नाट्य चमू.-तृतीय क्रमांक
मिळाला तर या वेळी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गटशिक्षणाधिकारी श्री, मनोज चव्हाण यांनी अभिनंदन केले तर या वेळी गट साधन केंद्रातील कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.