ताज्या घडामोडी

मानवत येथील के.के.एम. महाविद्यालया मध्ये कटारिया पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील के. के. एम. महाविद्यालयाच्या कै.श्री. पन्नालालजी (भाऊसाहेब ) चांडक सभागृहा मध्ये *कटारिया पारितोषिक* वितरन सोहळा संपन्न.

सविस्तर वृत्त असे की,

मानवत येथील के.के.एम. महाविद्यालयाच्या कै. श्री, पन्नालाजी ( भाऊसाहेब ) चांडक सभागृहा मध्ये दिनांक १० आॅगष्ट रोजी *कटारिया* पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी गूणवंत विद्यार्थ्यांना पन्नास हजाराचे रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
महाविद्यालयीन जिवनात विविध विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या निवासी उपजिल्हाधिकारी *अनुराधा ढालकरी* यांच्या हस्ते बक्षीसांचे वाटप करण्यात आले, या वेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री.विजयकुमारजी कत्रुवार. प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे सचिव श्री.बालकिशन भाऊ चांडक, कोषाध्यक्ष श्री रामचंद्रजी कत्रुवार, सन्माननिय संचालक श्री. विजयकुमाारजी दलाल ,श्री दिलीपजी हिबारे , श्री ज्ञानेशजी कत्रुवार, उपप्राचार्य डॉ. के.जी. हुगे, पर्यवेक्षक प्रा. श्री कापसे अनिल, NACC कॉर्डिनेटर प्रा. डॉ. दूर्गेश रवंदे ,आदी मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या *मानवता* अंकाचे विमोचन करण्यात आले, या वेळी भारतीय लोकशाही समोरील आव्हाने, या विषयावरचा अंक काढण्यात आला. संपादक मंडळाचे कार्यकारी संपादक प्रा. डॉ. पंडित लांडगे, सन्माननिय सदस्य प्रा. डॉ.सचिनजी चौबे, प्रा. डॉ. पवन पाटील संपादक मंडळातील महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी कु. मयुरी डुलगच, कु. चंचल राऊत, कैलास तळेकर. अंजली अहिरे, गीता कच्छवे ,कुमारी भोरकडे, आकांक्षा अंभोरे . इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रा. डॉ भास्कर मुंडे यांनी केले, या प्रसंगी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करण्यासाठी वेळेचे नियोजन करुन त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करायला हवे यश निश्चितच आहे. या वेळी श्री बालकिशन ( भाऊ ) चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप श्री. विजयकुमारजी कत्रुवार यांनी केले,
यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयीन कर्मचारी, पालक,आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी पारितोषिक वाचन प्रा. श्री विनोद हिबारे व प्रा संजय सूर्यवंशी यांनी केले, या वेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ शारदाताई राऊत यांनी केले. तर या वेळी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. श्री अनिल कापसे पाटील यांनी मानले,

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.