ताज्या घडामोडी

तीस लक्ष रूपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या* *गूरूदेव* आश्रमातील *भक्तनिवासाचे* पाथरी विधान सभा मतदार संघाचे आमदार सुरेशरावजी वरपूडकर यांच्याहस्ते भूमिपूजन

मानवत / प्रतिनिधी.

पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत तालूक्यातील कोथळा येथील गुरुदेव आश्रमात उभारण्यात येत असलेल्या भक्त निवासाचे भूमिपूजन आमदार सुरेशराव वरपूडकर यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न

सविस्तर वृत्त असे की,
पाथरी विधान सभा मतदार संघातील मानवत तालूक्यातील कोथळा येथील गुरुदेव आश्रम परिसरामध्ये पाथरी विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. सुरेशराव वरपूडकर यांच्या स्थानिक विकास निधितून उभारण्यात येत असलेल्या भक्त निवासाचे आज पाथरी विधान सभा मतदार संघाचे विकास पूरूष व लोकप्रिय आमदार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे भूमिपूजन प्रसंगी आचार्य स्वामी हरीश चैतन्य चैतन्यानंद सरस्वतीजी पळसखेडकर, आमदार सुरेश वरपूडकर यांच्या सह यावेळी कार्यक्रमासाठी बाळासाहेब रसाळ, शिवाजीराव बेले ,प्रा. डॉ. रामचंद्र भिसे, बाबुराव नागेश्वर, राष्ट्रिय काॅग्रेसचे मानवत तालूका अध्यक्ष बाबाजी अवचार, बालासाहेब फुलारी, परमेश्वर निर्वळ, सरपंच मयूर देशमुख ज्ञानेश्वर फंड, प्रताप फंड, भारत ईकर , सुभाषराव देशमुख, बाबासाहेब देशमुख,भास्करराव बोडके, पुंडलिक वैद्य सतीश निर्वळ ,सचिन पौळ, मुंजा भिसे ,सुनील पाते, दत्तराव पाते, अशोक रोकडे, रामेश्वर महाराज, संतोष देशमुख ,मदन कदम ,पप्पू सोरेकर भक्त गण पारडी, राजुरा, शेवडी येथील नागरिक मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.