ताज्या घडामोडी

ऑन जॉब ट्रेनिंग आजच्या काळाची गरज :-प्रा.नंदकुमार बोधगिरे

नांदेड:(दि.४ ऑगस्ट २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार
अर्थशास्त्रातील करिअर करिअरच्या संधी विषयावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्कूल ऑफ सोशल सायन्स मधील आपल्या इकॉनॉमिक्स विभागातील प्रा.नंदकुमार बोधगिरे सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलत असताना प्रा.नंदकुमार बोधगिरे सर यांनी असे प्रतिपादन केले की, सद्यस्थितीला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा पाहिला असता कृषी क्षेत्राचा वाटा घटत आहे . उद्योग क्षेत्राचा वाटा स्थिर आहे तर सेवा क्षेत्राचा वाटा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे येणाऱ्या काळात सेवा क्षेत्रात विशेषतः बँकिंग,हॉटेल मॅनेजमेंट आणि ई-कॉमर्स या क्षेत्रामध्ये

करिअरच्या जास्त संधी निर्माण होणार आहेत या संधींचा लाभ घेण्यासाठी त्या क्षेत्राच्या स्किल येणे आवश्यक आहे भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे सुशिक्षित बेकारांचे प्रमाण देखील खूप जास्त आहे परंतु जितक्या जास्त प्रमाणामध्ये स्किल लेबर आपल्याला पाहिजे आहेत तितक्या प्रमाणात स्किल लेबर आपल्याकडे उपलब्ध नाहीत म्हणून ही कमतरता दूर करण्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग या उपक्रमाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे,अर्थशास्त्र विभाग प्रमुख,डॉ.पी.आर.मुठ्ठे सर ,डॉ.डी.डी.भोसले, ,डॉ.डी.ए. पुपलवाड, प्रा.राहुल लिंगमपल्ले ,डॉ.शिवराज आवाळे , प्रा.देशमुख मॅडम ,प्रा.पवार मॅडम ,डॉ. प्रवीण शेलुकर ,डॉ,संतोष पाटील तसेच एम.ए.अर्थशास्त्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.डी.डी.भोसले यांनी केले तसेच आभार देखील मानले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.