ताज्या घडामोडी

अनिता बाबुराव राठोड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती.

अर्धापूर: प्रतिनिधी
अर्धापूर येथील शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर या पदावर कार्यरत असलेले बाबुराव राठोड यांची कन्या अनिता बाबुराव राठोड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती मिळालेली आहे.
एका दुर्गम भागातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या अनिता बाबुराव राठोड हिने अतिशय जिद्दीने व चिकाटीने मेहनत करून अभ्यास करून सन 2022 च्या एम.पी.एस.सी. राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादन केले होते. अता त्यांची पोलिस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. तसेचतसेच महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.जे.सी.पठाण, ग्रंथपाल डॉ.मधुकर बोरसे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. तिचे आई-वडील यांनी पेढा भरून आनंद साजरा केला व भाऊ बहीण मामा मामी व सर्व नातेवाईकांनी कौतुक केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.