ताज्या घडामोडी

आम्ही अण्णा भाऊंच्या रक्ताचे तर तुम्ही विचारांचे वारसदार बना – सचिन भाऊ साठे

डॉ.अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न किताब मिळाला पाहिजे यासाठी हजारो समाज बांधवांचा निर्धार)

नांदेड (प्रतिनिधी): अण्णा भाऊंनी वंचित,शोषित,बहुजनांच्या वेदना आणि दुःख साहित्यातून मांडण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला.अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे व्यवस्थेच्या विरूद्धचे युद्ध होते.त्यांच्या साहित्याने बंड करण्याची ताकद मिळते.वेगवेगळ्या राज्यात अण्णा भाऊंचे कुटुंब म्हणून आमचा सन्मान होतोच.भाऊंचे वंशज म्हणून आमच्याही आयुष्याचा सन्मान आहे.


कुटुंब म्हणून आम्ही अण्णा भाऊ साठे यांच्या रक्ताचे वारसदार असलो तरी आपण त्यांच्या विचाराचे वारसदार व्हावे असे भावनिक आवाहन अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांनी
नांदेड येथे डाॅ.अण्णा भाऊ साठे क्रांती सेने च्या वतीने आयोजित निर्धार मेळाव्यात बोलतांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णा भाऊ साठे यांच्या सूनबाई सावित्रीबाई साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. निर्धार मेळाव्यास उदघाटक म्हणून खासदार वसंतराव चव्हाण,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे राष्ट्रीय सचिव, गणेश भगत, टि.एन.कांबळे, प्रदेशाध्यक्ष राज क्षिरसागर, आ. माधवराव जवळगावकर, आ. मोहन हंबर्डे, माजी सनदी अधिकारी व्ही.जे.वरवंटकर, आनंदराव गुंडले, राष्ट्रवादी काॅग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर भिलवंडे,शिवा कांबळे,सतीश कावडे ,एन.डी.शेळके, एन.जी .पोतरे , नगरसेवक दयानंद भालेराव, रा.ना.मेटकर आदींची उपस्थिती होती.

डाॅ.अण्णा भाऊ साठे क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे ,व काॅग्रेस चे जिल्हा.ऊपाध्यक्ष विठ्ठल पावडे यानी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते.
सचिन भाऊ साठे म्हणाले की,अण्णा भाऊ साठे यांच्या कुटंबीयांकडे शासन नेहमीच दुर्लक्ष करत आहे.आम्ही सामजिक चळवळीत काम करतांना अडथळे आणले जात आहेत.राजकीय पातळीवर साठे कुटुंबाची बदनामी करण्याचा जाणीव पूर्वक प्रयत्न केला जातो आहे. आमची लढाई ही आता महाराष्ट्रतील मातंग समाजातील जनतेच्या ताकदीवर आहे.आपले प्रेम आणि साथ आम्हाला हवी असल्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.मातंग समाजावर नेहमीच जातीय हल्ले होत आहेत याबाबत मी लढण्यासाठी तुमच्या सोबत आहे.
राज्य शासनाने मातंग समाजाच्या प्रगतीसाठी ‘ आर्टी ‘ सुरू केली आहे.ही योजना कायम स्वरुपी टिकली पाहिजे.सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या उप वर्गीकरनाला मान्यता दिली.परंतु काहीजण यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत.यासाठी आपण लढा दिला पाहिजे असे ते म्हणाले.

डॉ.अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे – श्रीमती सावित्रीबाई साठे
अण्णा भाऊंच्या साहित्याची दखल ही जागतिक पातळीवर घेतली आहे.
वंचित , शोषित,बहुजन समाजाचे प्रश्न त्यांनी साहित्यातून मांडले.संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊंचे मोलाचे योगदान आहे.
डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा योग्य सन्मान होण्यासाठी भारत सरकारने अण्णा भाऊंना भारतरत्न किताब देऊन सन्मानित करावे याबाबत शासनाकडे आपण पाठपुरवा करून निर्धार करावा असे आवाहन त्यांनी या मेळाव्यात बोलताना केले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.