एम सी आर
Uncategorized

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठात अभिवादन

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज गुरुवार, दि.२२ जानेवारी, २०२६ रोजी विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास चंदनहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये स्वामीजींच्या प्रतिमेस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्र-कुलगरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ.एम.के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, वित्त व लेखाधिकारी डॉ.पराग भालचंद्र, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ.शैलेश वाढेर, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ.मारुती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. स्वामीजींच्या सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय योगदानाचे स्मरण यावेळी करण्यात आले.
——————————-

Share

Related posts

दिल्लीत महिला साहित्य संमेलन; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल

Chief Editor

जिजाऊंच्या संस्काराचा वसा आणि वारसा आजच्या मुलींनी घ्यावा : सुभाष ढगे

Chief Editor

संपलाही नाही संपणार नाही माझ्या भिमाचा दरारा* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते डॉ. शिवराज शिंदे यांच्या भीम गीताचे विमोचन

Chief Editor

विद्यार्थ्यांनी नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी देणारे उद्योजक बनावे” – नरेंद्र चव्हाण

Chief Editor

प्राणीशास्त्र हे जैवविविधता आणि पर्यावरणाचा भक्कम पाया – डॉ. रणजितसिंग निंबाळकर

Chief Editor

यशवंत ‘ मधील एनसीसी कॅडेट्सची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

Chief Editor

Leave a Comment