ताज्या घडामोडी

मानवत नगर परिषदेच्या वतीने पर्यावरण दिन साजरा

मानवत / प्रतिनिधी.

आज दिनांक 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधून मानवत नगर परिषदेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन मानवत नगर परिषदेचे मूख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरणा विषय बोलताना श्रीमती सावरे म्हणाल्या की, पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, वाढते तापमान, वाढते प्रदूषण यासाठी वाढते शहरीकरण औद्योगीकरण तसेच वृक्षतोड, अस्वच्छ परिसर इत्यादी गोष्टी कारणीभूत आहेत. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी,स्वच्छ पर्यावरण यासाठी वृक्षतोड थांबली पाहिजे व एक व्यक्ती एक झाड या समीकरणाची जोड पर्यावरणाला खूप आवश्यक आहे.
चालू वर्ष 2024 चा विचार केल्यास तापमानाचा पारा 48 अंश सेल्सिअसच्या वरती गेलेला आहे. या गोष्टीचा विचार केल्यास एका व्यक्तीने दोन झाडे लावणे ही आजच्या काळाची गरज आहे.
आणि नागरिकांनी सुद्धा पर्यावरण जतन व संवर्धन करणे खूप गरजेचे आहे.
मानवत नगर परिषदेच्या वतीने नेहमी स्वच्छता, प्रदूषण मुक्त शहर स्वच्छ पाणी वृक्ष लागवड इत्यादी बाबीकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले जात आहे. नागरिकांनी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा व प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी केले आहे.
आज जागतिक पर्यावरण दिना निमित्त कार्यालयाच्या वतीने वाटर फिल्टर मानवत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास पर्यावरण प्रेमी गणेश आप्पा चिंचोलकर यांनी झाडांची रोपे उपलब्ध करून दिली व या कार्यक्रमास स्वतः उपस्थित राहिले. याबद्दल श्रीमती कोमल सावरे यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास मानवत नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी अभियंता सय्यद अन्वर , कार्यालयीन अधिक्षक भगवानराव शिंदे , कर निरिक्षक श्री भारतराव पवार, स्वच्छता निरिक्षक श्री मुंजाभाऊ गवारे, हनुमंत बिडवे, श्री पी आर पवार, श्री.संजय रुद्रवार, लिपिक, श्री महेश कदम, अंतर्गत लेखापरीक्षक, श्री शतानिक जोशी, विद्युत अभियंता,श्री संतोष खरात, संगणक अभियंता,श्री मुंजासा खोडवे, लेखापाल, श्री.संतोष उन्हाळे, कर निरीक्षक, श्री.राजेश शर्मा कर निरीक्षक,श्री.रामराव चव्हाण, कर निरीक्षक, नारायण व्यवहारे, शेख वसीम, श्री.रवी दहे, मनमोहन बारहाते लिपिक,श्री. सचिन सोनवणे, लिपिक, श्रीमती वंदना इंगोले, श्रीमती शितल सोळंके, सुनिता वाडकर, श्री.रावसाहेब झोडपे, विद्युत विभाग, श्री सुनील कीर्तने, स्वच्छता विभाग सहाय्यक,श्री दीपक भदर्गे, श्री यशपाल भदर्गे, श्री जावेद मीर,शाम दहे, श्री रवी कच्छवे, राज भाकरे, बाबासाहेब नंदनवरे यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.