ताज्या घडामोडी

पहिल्याच दिवशी गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांची कोल्हा जिल्हा परिषद शाळेत हजेरी

मानवत / प्रतिनिधी.

आज १५ जून शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ शाळेचा पहिला दिवस असल्यामूळे मानवत पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी श्री मनोज चव्हाण यांनी कोल्हा केंद्रीय प्राथमिक शाळा आणि कोल्हा जिल्हा परिषद प्रशाला या दोन्ही शाळांना शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाच्या पहिल्याच दिवशी भेट देअऊन हजेरी लावली. यावेळी गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या हस्ते इयत्ता पहिलीच्या मुलांचे पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी सर्व वर्गातील मुलांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी नूतन गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व पूष्पहार व पूष्पगूच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री गजानन सरोदे , प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीपकूमार तांबे, केंद्रप्रमुख श्री. प्रकाश मोहकरे, शिक्षक श्री सुनिलकूमार तोष्णीवाल, श्रीमती, वंदनाताई निकम , श्रीमती करूणाताई जोंधळे, श्रीमती पद्मजाताई गोरे, श्रीमती रंजनाताई धुमाळ, श्रीमती कल्पनाताई देशपांडे, श्रीमती मंजूषाताई जोशी , श्रीमती प्रेमिलाताई वारकरे, श्रीमती शोभाताई तमन्ना, यांच्या सह शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.