ताज्या घडामोडी

मानवत शहरात ईद – उल-अज़हा उत्साहात साजरी

ईदचे औचित्य साधून ईदगाह परिसरात १०० वृक्षारोपण करण्यात आले.

मानवत / प्रतिनिधी

दिनांक १७ जून रोजी मानवत शहरात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने बकरी ईद म्हणजेच (ईद-उल-अज़हा) साजरी करण्यात आली आहे. सकाळी पाऊस येत असल्यामुळे मानवत शहरातील मुस्लीम समाज बांधवांनी आपापल्या परिसरातील मस्जिद मध्ये सामूहिक नमाज पठण करून ईद साजरी केली.
ईदची नमाज शहरातील मस्जिद मध्ये अदा करुन मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लीम समाज बांधवांची (ईद-उल-अज़हा) बकरी ईद हा सण मानवत शहरातील मूस्लिम समाज बांधवांनी श्रध्देने व भक्तीभावाने मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी मुस्लिम धर्मगुरूंनी समाजा समाजात एकता कायम राहावी, आणि शेतकरी बांधवांना
दिलासा मिळावा, चांगला पाऊस व्हावा, देशात शांतता व सुव्यवस्था राहावी, अशी प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली. मुस्लिम समाज बांधवांकडून वर्षभरात दोन महत्त्वाचे सण साजरे केले जातात ज्यात रमजान ईद आणि बकरी ईदचा समावेश होतो.
रमजान ईद झाल्यावर सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी केली जाते
मात्र बकरी ईद साजरी करण्याबाबत आणि कुर्बानी देण्याचा एक इतिहास आहे. ज्याचा कुराआन मध्ये उल्लेख करण्यात आला आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सौदी अरबच्या मक्कामध्ये एकत्र येऊन हज साजरा करतात. ज्यात जगभरातील मुस्लीम सहभागी असतात.
याच सणाला ईद-उल-अजहा म्हणतात ज्याचा अर्थ त्यागाची ईद असा होतो.
मुस्लिम समाज बांधवांमध्ये रमजान ईद प्रमाणेच ईद-उल-अजहा ला विशेष महत्त्व समजले जाते.
मानवत शहरात स्वच्छतेबाबत मुख्य अधिकारी कोमल सावरे, ओ.एस. भगवान शिंदे, अभियंता सय्यद अन्वर,यांच्या मार्गदर्शनाखाली भारत पवार,स्वच्छता निरीक्षक मुंजाभाऊ गवारे, संजय नंदनवरे, कांचन झोडपे, अभिषेक रासवे, विकी नितनवरे, सुनील कीर्तने,दीपक भदर्गे,यांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले त्याच प्रमाणे मुक्ती मोहम्मद मुजाहिद,माजी नगर सेवक हबिब भडके , शेख मुस्ताक, यांनी मुस्लिम बांधवांना स्वच्छता ठेवा असे अवाहन या वेळी केल होते.

*(( चौकट.))*

वाढते तापमान, पाण्याचे दुर्भिक्ष, पावसाची अनिश्चितता, वाढते प्रदूषण, बेसुमार वृक्षतोडीतून घटते वनक्षेत्र. यामुळे ‘ग्लोबल वार्मिंग’ची झळ सर्वांना सोसावी लागत आहे.
या उद्देशानेच बकरी ईद (ईद-उल-अज्हा-) ज्या अनुषंगाने उक्कलगाव शिवारातील मोठी ईदगाह मैदानावर मानवत पो.स्टेचे कर्तव्यदक्ष स.पो.नी. संदीप बोरकर, यांच्या मार्गदर्शनाखाले बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी स.पो.नी. बालाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, गोपनीय शाखेचे विलास मोरे यांच्या सह पोलिस कर्मचारी बांधव यावेळी बंदोबस्तात होते, तर मानवत नगर परिषदचे कर निरिक्षक भारत पवार, स्वच्छता निरीक्षक मुंजाभाऊ गवारे, धर्मगुरू मुफ्ती मोहम्मद मुजाहिद, हाफेज लतिफ, मौलाना असलम ईशाती, हाफेज मेराज,हाफेज अनिस,हाफेज अय्याज,हाफेज अबरार, यांच्या हस्ते सुमारे १०० झाडे लावण्यात आली या सर्व झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी मानवत नगर परिषदेचे माजी नगरसेवक नियमात खान, व समाजसेवक महोम्मद मुस्ताक, यांनी घेतली. यावेळी सामाजिक राजकीय प्रतिष्ठित मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्ये उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.