https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आपला जिल्हा

चिचडोह प्रकल्पाचे सर्व दरवाजे होणार बंद

गडचिरोली,प्रतिनिधी :-

वैनगंगा नदीवर चिचडोह बॅरेज,ता.चामोर्शी जि.गडचिरोली येथील व्दार संचलन कार्यक्रमानुसार सदर बॅरेजची एकूण लांबी 691 मी.असून 15,00 मीटरलांबीचे व 9.00 मी.उंचीचे 38 लोखंडी (पोलादी )दरवाजे बंद करुन पाणीसाठा करण्याचे नियोजित आहे.दिनांक 15ऑक्टोंबर 2022 पासून सर्व दरवाजे  द्वार संचलन कार्यक्रमानुसार (प्रथम नदी काठावरील व क्रमाने क्रमाने नदीच्या मध्यभागातील द्वारे) क्रमाने क्रमाने  बंद करण्यात येणार  आहे.   

     त्यामुळे नदीतील  पात्रात उर्ध्व बाजूस व नदीत आलेल्या उपनद्या व नाल्यांमध्ये पाणीसाठा निर्माण होणार आहे. आणिक नदीतील पाण्याची पातळी वाढणार आहे.वाढलेल्या पाणीसाठयामुळे जिवीत व वित्त हानी होवु नये म्हणून  सर्व लगतचे गावांना/ ग्रामपंचायतींना सुचना देण्यात येते की,त्यांनी आपले गावक-यांना याबाबत दवंडी व्दारे सुचीत करावे व नदी काठावर जाणे टाळण्याच्या तसेच नदीकाठावरिल शेतांमध्ये कामे करतांना सतर्क राहण्याच्या सुचना द्याव्यात. या कार्यालयाने बुडीत क्षेत्रासाठी संपादीत केलेल्या शेतांमध्ये शेतीची कोणतीही कामे करु नयेत.

मार्केडा देवस्थान येथील यात्रेकरु नदीवर आंघोळ करतांना,मासेमारी करणारे,रेती घाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणारे अशा जनतेने  खबरदारी घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे.अन्यथ: होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.असे उपकार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग चंद्रपूर  यांनी कळविले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704