https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्रीडा व मनोरंजन

तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२२-२३ चे आयोजन सभा

गडचिरोली,प्रतिनिधी :-

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्याने सन २०२२-२३ या सत्रात शालेय क्रीडा स्पर्धेचे  आयोजन तालुकास्तरापासुन ते राज्यस्तरापर्यंत करण्यात येत असल्याने सदर स्पर्धेचे आयोजन व नियोजन करण्याचे अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली दि. १८/१०/२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे सभेचे आयोजन करण्यात येत आहे.

सदर सभेत या सत्रातील होणाऱ्या स्पर्धांच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा व निर्णय घेण्यात येत असल्याने आपल्या शाळेतील क्रीडा शिक्षक/सहाय्यक शिक्षक यांना सदर सभेस वेळेवर उपस्थित राहण्याचे कळवावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  गडचिरोली यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704