https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत मध्ये केंद्राच्या दडपशाही धोरणाच्या विरोधात इंडीया आघाडीच्या वतीने निषेध.

मानवत // प्रतिनिधी.

मानवत येथे दिनांक 22-3-2024 रोजी मानवत तहसील येथे आज केंद्र सरकारच्या निषेधार्त दिल्लीचे विद्यमान आप सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक व राष्ट्रीय कांग्रेस प्रक्षाची बैंक खाते गोठवल्या प्रकरणी निवेदन देण्यात आले. केंद्रातील सत्ताधारी सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुड बुध्दिने वागवत असून देशामधे दडपशाही व हुकुमशाही राबवत आहे. मानवत इंडींया आघाडीच्या वतीने केंद्राच्या दडप शाही धोरणाचा निषेध करण्यात आला.
या सर्व घटने मुळे सामान्य नागरीकासह पक्षाचे कार्य कर्ते भयभित झाले असून केंद्र सरकारच्या दडपशाही धोरणाचा निषेध व्यक्त केल्या जात असून आज मानवत इंडीया आघाडीच्या वतीने तहसिल प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
या वेळी कार्यकर्त्यासह नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन मानवत तहसिलच्या नायब तहसिलदार अंभोरेताई , तहसिल प्रशासनातील धारासुरकर साहेब यांनी यावेळी निवेदन स्विकारले यावेळी मानवत इंडीया आघाडीचे कॉ.रामराजे महाडिक ( मार्क्सवादी क तयम्युनिस्ट पक्ष) शिवसेना शहरप्रमूख अनिल जाधव, मानवत राष्ट्रीय काॅग्रेस कमीटीचे शहराध्यक्ष शामभाऊ चव्हाण, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काॅ. अशोक बुरखूंडे , कॉ लिंबाजी धनले (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ) , शिवाजी सोरेकर, ज्ञानेश्वर कोकरे , महादेव भुजबळ , भिमा डोईफोडे, शिवसेनेचे उपशहरप्रमूख अप्पा भिसे यांच्यासह मानवत इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यासह शेकडो नागरीक या वेळी उपस्थित होते.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704