https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

सावरगाव खु. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मेळावा संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालुक्यातील मौ. सावरगाव खु. जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीचा प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मेळावा आयोजित करण्यात आला होता. *बाल रक्षक प्रशिक्षणा* च्या निमित्ता ने इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मेळावा घेण्यात आला यावेळी उपस्थित नवोदित प्रवेश पात्र बालकांचे चॉकलेट्स, फुगे, गुलाब पुष्प देऊन शाळेच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात मानवत येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणारे सावरगाव तथा मानवत केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. शिरीषजी लोहट यांचा *शाल,श्रीफळ व पूष्पगूच्छ* देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तर नुकतेच जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी पवित्र पोर्टल मधून शिक्षक पदावर नवनियुक्त झालेले सावरगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ सन्माननिय सदस्य श्रीधरजी हरकळ यांचा ही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी कार्यक्रमास सावरगाव जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विष्णू दादा घाटूळ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुरलीधरजी शिराळ, प्रशिक्षण समन्वयक श्री. राजकुमार गाडे यांच्या सह सावरगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व केंद्रांतर्गत बालरक्षक प्रशिक्षणार्थी शिक्षक या वेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704