ताज्या घडामोडी
राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत विशेष युवक शिबीराचा समारोप
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत के. के. एम. महाविद्यालय मानवत यांच्या वतीने विशेष युवक शिबीर अयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा समारोप दिनांक ३० जानेवारी रोजी करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांचा समारोपा प्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी के. के. एम. महा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंढे यांचा सत्कार करताना सावळी ग्राम पंचायतीचे सन्माननिय सदस्य श्री. बाळासाहेब काळे पाटील, पोलीस पाटील श्री. बाळासाहेब काळे उपसरपंच गोपाळराव काळे, नामदेवराव काळे यांच्या सह या वेळी सावळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
***