जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात बाल संसदेची निवडणूक संपन्न* *विद्यार्थ्यानी अनूभवला निवडणूक प्रक्रियेचा अनूभव.

**
*
____________________________________
मानवत / प्रतिनिधी.
*लोकशाही* मजबूत व सक्षम ठेवण्याचे निवडणूक प्रक्रिया हे सक्षम माध्यम असल्यामूळेच आज मानवत येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयामध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या उप क्रमांतर्गत बाल संसद निवडणूक घेण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये लोक शाहीचे मूल्य रुजावे व निवडणूक कशी असते या सर्व प्रक्रियेची ओळख व्हावी म्हणून ही निवडणूक घेण्यात आली.
उमेदवारी अर्ज दाखल करणे, प्रचार, निकाल या सर्व टप्यांमधून निवडणूक पार पडली प्रत्यक्षा मध्ये जे विद्यार्थी उमेदवार म्हणून सहभागी झाले होते त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले. या निवडणूक प्रक्रियेत इयत्ता पाचवी ते दहावीचे सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तर या वेळी प्रत्येक वर्गातून एक मुलगा एक मुलगी असे दोन वर्ग प्रतिनिधी मतदानाच्या प्रक्रियेतून निवडण्यात आले सर्व वर्ग प्रतिनिधींच्या मतदाना मधून शाळा प्रतिनिधी म्हणून इयत्ता दहावीची गौरी नलावडे तर उपशाळा प्रतिनिधी म्हणून रणवीर तारे याची निवड *लोकशाही* पध्दतीने करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून अर्जुनराव भिसे व राहुलजी ढगे यांनी काम पाहिले. या प्रसंगी विजयी उमेदवारांचे स्वागत संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक प्राचार्य नितीनजी लोहट, परिवेक्षक सुरेशराव भिसे, विभाग प्रमुख अशोकराव दुधारे यांनी केले. निवडणूक यशस्वी करण्यासाठी सुनीलराव काळे ,अर्चनाताई कोतावर ,मनिषाताई माने , पुरुषोत्तमराव देवडे ,श्यामराव गिराम या वर्गशिक्षक तसेच सर्व विद्यार्थ्यांनी या वेळी परिश्रम घेतले.
***