नागरजवळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे* चित्रकला परीक्षेत घवघवीत यश
मानवत / प्रतिनिधी.
मानवत तालूक्यातील नागरजवळा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी
इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्री.जुकटे सर, चिंचाने सर,श्री.किर्तनकार सर, श्रीमती दसमले मॅडम, श्रीमती गिरी मॅडम,श्रीमती देशमुख मॅडम आणि श्री.गणेश देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले. तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या परिक्षेमध्ये यशस्वीपणे गूण संपादन करणारे.
१.प्रतिज्ञा गजानन होगे , २.प्रियंका विलास होगे , ३.राजकन्या पांडुरंग , ४.मांगा नानू बारेला , ५.गीता शिवाजी होगे , ६.हर्षदा श्रीकिशन होगे , ७.पूजा विठ्ठल होगे, ८.भक्ती सुरेश होगे , ९.अक्षरा मदन होगे
या परीक्षेत नऊ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. नऊपैकी नऊ विद्यार्थी चित्रकला परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. शंभर टक्के निकाल लागला. गूणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यास अनेकांनी शुभेच्छा दिल्या
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈