https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

मानवत येथील ४२ व्या जिल्हास्तरीय स्काऊट गाईड मेळाव्या प्रसंगी शहरातून भव्य शोभा यात्रा

भव्य शोभा यात्रेने मानवत नगरी दुमदुमली: शोभायात्रेतील *विविध देखाव्यानी मानवतकरांची मने जिंकली

मानवत / प्रतिनिधी.

मानवत येथील *कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय* मौ. रत्नापूर येथे सुरू असलेल्या ४२ व्या जिल्हास्तरीय स्काऊट आणि गाईड मेळाव्याच्या आजच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात भव्य शोभा यात्रेने झाली. या प्रसंगी शोभा यात्रेस हिरवी झेंडे दाखवण्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक *दिपक दंतुलवार*, रत्नापूर ग्रामपंचायतचे सरपंच चक्रधर राजे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष गटशिक्षणाधिकारी. डी. आर. रणमाळे, मुख्यध्यापक नंदकुमार सिसोदिया, पुंडलिक कजेवाड, गोरोबा बनसोडे, भारत मांडे, विलास खरात, केंद्रप्रमुख कान्हू लहिरे, विलास लांडगे, माणिक घाटूळ, अनिल धुतमल यांच्या सह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी स्काऊट गाईड पथकाला हिरवी झेंडे दाखवून शोभा यात्रेस *प्रारंभ केला* शोभायात्रा मानवत बस स्थानक परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मोठा मारुती परिसर देवी मंदिर व मुख्य मार्केट मार्गे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत येथे विद्यार्थ्यांना अल्पोपहार व्यवस्था करण्यात आली त्यानंतर शोभायात्रा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रत्नापूर येथे विसर्जित करण्यात आली शोभा यात्रेत राम व लक्ष्मण सीता यांचा सजीव देखावा वीर हनुमान तसेच रहदारीचे नियम देशभक्ती पर स्लोगन संत गाडगेबाबा लेझीम पथक पारंपारिक वेशभूषा, छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी असे विविध देखावे सादर करून समस्त मानवतकरांची मने जिंकली यावेळी शोभा यात्रेत मोठया प्रमाणात विविध शाळेतील स्काऊट आणि गाईडचे विद्यार्थी तसेच शिक्षक सहभागी झाले होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704