https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

डॉक्टर्ससाठी आयोजित क्रीडा स्पर्धांना प्रतिसाद

मानवत / प्रतिनिधी.

परभणी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांसाठी शनिवार ता २७ पासून डॉक्टर्स स्पोर्ट मिट २०२४ या विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे .
परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम वर या स्पर्धा होत असून यावर्षीचे यजमानपद परभणी जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनला मिळाले आहे .
या स्पर्धेत जिल्ह्यातील ५०० पेक्षा जास्त डॉक्टर्स स्पर्धेत सहभागी झाले आहेत . शनिवारी ता २७ व रविवारी २८ झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत आयएमय संघाने ने प्रथम तर निमा संघाने द्वितीय क्रमांक पटकावला . टेबलटेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी मध्ये डॉ रामकीशन इक्कर , डॉ शाकेर अल करीम , व डॉ प्रवीण पाटील यांनी अनुक्रमे प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला . महिला एकेरीत डॉ बागेश्री भरड , डॉ पदमांजली टाले , डॉ अर्चना निरस यांनी बाजी मारली .
पुरुष दुहेरीत डॉ प्रवीण पाटील , डॉ शाकेर अल करीम , डॉ गोविंद वरपूडकर व डॉ विजय गजभरे यांनी विजय मिळवला . महिला दुहेरीत डॉ बागेश्री भरड , डॉ अर्चना निरस , डॉ मानसी पाठक , डॉ पदमांजली टाले यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला . मिक्स दुहेरी स्पर्धेत डॉ अभिषेक भरड व डॉ बागेश्री भरड तसेच डॉ कालिदास निरस व डॉ अर्चना निरस यांनी बाजी मारली .
बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये डॉ अमोल मेटे व डॉ बशीर खान यांनी तर महिला एकेरीत डॉ बागेश्री भरड व डॉ अर्चना निरस यांनी विजेतेपद पटकावले . पुरुष दुहेरीत डॉ अमोल मेटे व डॉ बशीर खान तसेच डॉ आंनद साने व डॉ राहुल सोनी यांनी तर महिला दुहेरीत डॉ बागेश्री भरड , डॉ अर्चना निरस , डॉ दीपाली केंद्रे , डॉ पदमांजली टाले यांनी बाजी मारली . मिक्स दुहेरीत डॉ नितेश इदाते व डॉ बागेश्री भरड तसेच डॉ प्रवीण केंद्रे व डॉ दीपाली केंद्रे यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला .
८ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान क्रिकेट स्पर्धा संपन्न होणार आहेत .
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी होमिओपॅथीक डॉक्टर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ सचिन कदम , कार्याध्यक्ष डॉ इरफानखान आगाई , सचिव डॉ सुनील जाधव व इतर सदस्य प्रयत्न करीत आहेत.

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704