https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेजच्या वार्षिक स्नेह संमेलनाला सुरुवात

—————————————–
उदगीर :-येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद नर्सिंग कॉलेजच्या शै.वर्ष 2023-24 च्या वार्षिक स्नेह संमेलनास सुरुवात झाली आहे. सदरील स्नेहसंमेलन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, स्वामी विवेकानंद कॉलेजचे परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ.शेषनारायण जाधव,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता तथा सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्नेहसंमेलनात कबड्डी, खो- खो, धावण्याची स्पर्धा, चेस स्पर्धा,कॅरम स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धा या खेळा बरोबरच सांस्कृतीक स्पर्धा ज्यात अंताक्षरी, संगीत खुर्ची, गीत गायन, प्रश्न मंजुषा, वाद – विवाद स्पर्धा, मुक अभिनय, वैयक्तिक नृत्य,समूह नृत्य, मिमिक्री स्पर्धा, नाटक, समूह गायन, आनंद नगरी, शेला पागोटे सादे आणि संगीत आदी स्पर्धेसह अनेक भरगच्च कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
सदरील स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण दि.06/02/2024 रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या उपस्थितीत होणार असून हे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रिन्सी बी, प्रा. स्वाती येवडगे, प्रा. रेखा सूर्यवंशी, प्रा. श्रद्धा सोनकांबळे, प्रा. शिल्पा कवठे, प्रा. अतुल मगर, प्रा. दिपाली ठोके, प्रा. वैष्णवी मारे, बालाजी कदम, नरसिंग जानके, सुरेश पवळे, शकुंतला सोनकांबळे, योगेश काळे परिश्रम घेत आहेत

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704