स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वार्षिक स्नेह संमेलनाला उत्स्फूर्त सुरुवात
—————————————–
उदगीर :-येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयामध्ये शै.वर्ष 2023-24 च्या वार्षिक स्नेह संमेलनास उस्फूर्तपणे सुरुवात झाली आहे. सदरील स्नेहसंमेलन हे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.धनंजय गोंड, परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ.शेषनारायण जाधव,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.अमर तांदळे, पत्रकारिता तथा सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.राहुल पुंडगे, राशिद दायमी, प्रा.आकाश कांबळे यांच्या उपस्थित या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले.
प्रारंभी दि. 29/01/2024 रोजी सकाळी 10: 00 वाजता ऑलम्पिक विजेते कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व नारळ फोडून उपप्राचार्य डॉ.धनंजय गोंड यांनी स्नेहसंमेलनाची सुरूवात केली.हे वार्षिक स्नेह संमेलन 29 जानेवारी ते 07 फेब्रुवारी या दरम्यान चालणार आहे.या स्नेहसंमेलनात कबड्डी, खो- खो, धावण्याची स्पर्धा, चेस स्पर्धा,कॅरम स्पर्धा, बॅडमिंटन स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धा या खेळा बरोबरच सांस्कृतीक स्पर्धा ज्यात अंताक्षरी, संगीत खुर्ची, गीत गायन, प्रश्न मंजुषा, वाद – विवाद स्पर्धा, मुक अभिनय, वैयक्तिक नृत्य,समूह नृत्य, मिमिक्री स्पर्धा, नाटक, समूह गायन, आनंद नगरी, शेला पागोटे सादे आणि संगीत आदी स्पर्धेसह अनेक भरगच्च कार्यक्रम या वार्षिक स्नेह संमेलनात घेण्यात येणार आहे.
सदरील स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण दि.05/02/2024 रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या उपस्थितीत होणार असून हे वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्रा. हनुमंत सुर्यवंशी, प्रा.संजीवनी भालेराव, प्रा. असिफ दायमी, प्रा. ऋतुजा डिग्रस्कर, प्रा. आवेज शेख, प्रा. राखी शिंदे, प्रा. सोनल सोनफुले, प्रा.त्वरिता मिटकरी, प्रा. वैष्णवी गुंडरे, प्रा. नावेद मणियार, प्रा. अनुजा चव्हाण, विद्यार्थी कल्याण मंडळाची सचिव कु. सयदा हजेरा कादरी, खेळ प्रतिनिधी मुस्तखिम शेख, सांस्कृतिक प्रतिनिधी रोहन कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी वैष्णवी निटूरे, विद्यार्थीनी प्रतिनिधी साक्षी बिरादार, वर्ग प्रतिनिधी शरवू घोगरे, वरुणकुमार सुर्यवंशी, क्षितिजा गुरूडे, सुमित शेल्हाळे,प्रियंका उगीले, मशना फड, आनंद गायकवाड, कोमल गायकवाड, ऋतुजा गायकवाड, कार्तिक बिरादार, सायमा पटेल, अमोल वाघमारे, उषा गायकवाड, अमोल भातकुळे, अपर्णा काळे, कुशालबाई गायकवाड परिश्रम घेत आहेत.