आरोग्य व शिक्षण

वसंतराव नाईक महाविद्यालयात स्नेहसंमेलनास उत्स्फुर्त प्रतिसाद

नवीन नांदेड-दि.२६ वसंतराव नाईक महाविद्यालयात दिनांक २३ ते २६ जानेवारी २०२४ या काळात प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक स्नेहसंमेलन – २०२४ चे आयोजन करण्यात आले. या स्नेहसंमेलना निमित्त विविध क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले त्यात महाविद्यालयाच्या वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.या स्नेहसंमेलनाचा उद्घाटन आणि पारितोषिक वितरण समारंभ श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ.माधुरी देशपांडे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांनी केले. या वेळी उद्घाटकीय मार्गदर्शन करताना प्र- कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वपूर्ण बदलाविषयी अद्ययावत माहिती दिली. तसेच वर्तमान परिस्थितीत महिलांचा प्रशासनातील वाढत्या प्रभावाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठीण परिश्रम घेतले पाहिजेत असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांना काळानुरूप स्वतःत सकारात्मक बदल घडवण्याचे आव्हान केले. या प्रसंगी महाविद्यालयातील मराठी विभागाद्वारे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-२०२४ ‘ आणि ‘भारतीय प्रजासत्ताक दिन विशेषांक’ ‘वसंतदर्पण’ या भित्तीपत्रकाच्या माध्यमातुन प्रसिध्द केला. त्याचे मान्यवरांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले. तसेच शाहिर रमेश गिरी यांची शाहिरी आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सतीश कासेवार यांच्या मिमिक्रीचा आनंद विद्यार्थ्यांनी मनमुरादपणे लुटला.या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. शांतादेवी जाधव, उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. पी.दिंडे, स्नेहसंमेलनाच्या प्रभारी प्रो.डॉ.रेणुका मोरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. व्यंकटेश देशमुख,प्रा.पी.बी.चव्हाण,स्वा रा ती म विद्यापीठाच्या रासेयो चे माजी समन्वयक डॉ.नागेश कांबळे, महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. व्ही. व्ही. मोरे,क्रीडा विभाग प्रमुख डॉ. एस. जी. मोरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. साहेबराव शिंदे आणि संस्कृत विभागाच्या प्रा.नंदिनी सुधळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. नागेश कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.या नंतर विद्यार्थ्यांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी,विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.