एम सी आर
Uncategorized

मराठी भाषेचे संवर्धन;ही काळाची गरज! -डॉ.सूर्यप्रकाश जाधव

नांदेड :(दि.१९ जानेवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील मराठी विभाग आणि कै.डॉ.शंकरराव चव्हाण लेक्चर सिरीजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कविता वाचन व व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथील मराठी विभागप्रमुख व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.सूर्यप्रकाश जाधव व महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी श्री. अमृत तेलंग होते.
प्रथमतः दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.संजय जगताप यांनी तर स्वागतपर मनोगत डॉ.विश्वाधार देशमुख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय हिंदवी जाधव व दुर्गा देशमुख यांनी करुन दिला.
डॉ.सूर्यप्रकाश जाधव यांनी, ‘अभिजात मराठी भाषा: काल, आज आणि उद्या’ या विषयावरील मार्गदर्शनात,’मराठी भाषेची अभिजातता टिकून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे. भाषा समृद्धीमध्ये विद्यार्थी अत्यंत महत्त्वाचा घटक असून भाषा आणि संस्कृतीची जोपासना विद्यार्थ्यांनीच केली पाहिजे, असे ते म्हणाले. याप्रसंगी अमृत तेलंग यांनी आपल्या गाव आणि गावगाड्याविषयीच्या अंतःर्मुख करणाऱ्या कवितांनी श्रोत्यांची मने जिंकली. शेतकरी जीवनाचे अत्यंत विदारक चित्रण त्यांनी आपल्या कवितेतून केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले व यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य आत्मसात करून कौशल्याचे उपयोजन आपल्या जीवनात यशस्वीपणे करावे. यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना नेहमी मदत करीत राहील, अशी हमी देऊन नवनवीन उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा करून दिल्या जाईल, असे गौरवोद्गार काढून उपक्रमशील मराठी विभागाच्या वतीने घेतलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा केली.
याप्रसंगी अभिजात मराठी भाषेच्या संदर्भाने दोन भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. त्या भित्तीपत्रकाचे संयोजन डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी केले. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांची स्वागतपर मनोगते व्यक्त झाली.
सूत्रसंचालन राधा कराड ह्यांनी तर शेवटी आभार गोदावरी कानशुक्ले ह्यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ.अजय गव्हाणे आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक गजानन पाटील यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

मालेगावात दिवसाढवळ्या चोरी; शिवशक्ती ज्वेलर्स मालकाची बॅग लंपास

Chief Editor

नांदेड: शहरातील डी मार्ट रस्त्यावर तिहेरी हत्याकांड; गँगवॉरनंतर रुग्णालयातही खून

Chief Editor

अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी आत्महत्या हा पर्याय नाही; मदत मागा, आयुष्याला नवी दिशा द्या

Chief Editor

बदलीनंतरही जपलेले प्रेम अन् सन्मान; माजी शिक्षक गुलाबराव मदने यांचा भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळेत भावनिक सत्कार

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘प्रगत आण्विक जीवशास्त्र’ प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

Chief Editor

जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा, साखरा येथे शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न!

Chief Editor

Leave a Comment