https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्रीडा व मनोरंजन

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “स्त्रीची जात” :लैलेशा भुरे

*स्त्रीची जात*
**************************
एकदा एका पुरुषाने स्त्रीला विचारले…तुझी जात कोणती?
स्त्रीने त्या पुरुषालाच उलट प्रश्न केला…तू एका बाईची जात विचारतो आहेस की एका आईची?
पुरुष म्हणाला….तू दोघांचीही काय जात असते ते सांग.नाही वाटत यात काही फरक असावा.पुरुष असे बोलून मोठमोठ्याने हसायला लागला.

 

 

 


त्या स्त्रीने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली….एक स्त्री जेव्हा आई होते,तेव्हा ती जाति-विहीन होते.
पुरुषाने आश्चर्याने विचारले…ते कसे काय?
स्त्री म्हणाली…. जेव्हा एक स्त्री आपल्या बाळाचे पालन करते,त्याची शी-सू स्वच्छ करते तेव्हा ती ‘शूद्र’ होते.
जेव्हा बाळ थोडे मोठे होते,तेव्हा आई आपल्या बाळाचे नकारात्मक गोष्टींपासून रक्षण करते तेव्हा ती ‘क्षत्रिय’ होते.
जेव्हा बाळ अजून थोडा मोठा होतो,तेव्हा आई त्याला शिक्षित करते तेव्हा ती ‘ब्राह्मण’ होते.
जेव्हा तिचा बाळ मोठा होऊन कमवण्यास लायक होतो, तेव्हा एक आई त्याचा’आय आणि व्यय’ या गोष्टींमध्ये त्याची मार्गदर्शक ठरते तेव्हा ती स्त्री ‘वैश्य’ धर्माचे पालन करते.
अशा प्रकारे कुठलीही स्त्री आई झाल्यावर जाति-विहीन होते.
स्त्रीचे उत्तर ऐकून पुरुष अवाक् झाला.त्याच्या नजरेत स्त्रियांसाठी आदरयुक्त भाव होता.त्या स्त्रीला आपल्या आई आणि महिला असण्याचा सार्थ अभिमान वाटत होता.
**************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704