https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
क्रीडा व मनोरंजन

एम सी आर न्यूज कवयित्री आपल्या भेटीला “मनाचे रंग”:लैलेशा भुरे

मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर किती हाकला हाकला,फिरी येतं पिकांवर

       मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर
       किती हाकला हाकला,फिरी येतं पिकांवर

बहिणाबाई चौधरींची ही कविता मनाची चंचलता व्यक्त करते.मनासारखं चंचल कुणीही नाही.मनात चाललेल्या विचारांचा गुंता सोडवणे फारसे सोपे नाही.आपल्या देहाला मन आयुष्यभर नाचवत असतं.आता संतांचेच बघा ना!त्यांनी कधीच मनाचे ऐकले नाही, तर मनावर त्यांनी ताबा मिळवला.लोकांना आपल्या चांगल्या आचरणातून, प्रवचनातून किंवा सत्संगातून चांगल्या वाईटाची जाणीव करून दिली.आपण सामान्य माणसे आहोत.आपल्या मनात लोभ,मोह,माया,राग,लोभ, मत्सर या भावना निसर्गतःच असतात.आपण मनावर ताबा ठेवून इतरांशी आपले आचरण चांगले ठेवू शकतो.या भावनांमुळे आपले मन अशांत होते.
मनावर कित्येक कविता,गाणी लिहल्या गेली आहेत.कधी मुक्तपणे इतरांशी मिसळणा-या,कधी मोहरणा-या,कधी कुणाशी भांडणा-या मनाला एका श्वासात व्यक्त करणे फारच अवघड आहे.मन एक दैवी देणगी आहे.त्यात अनेकानेक गोष्टी सामावलेल्या असतात.मनात नकारात्मक गोष्टींचा संचय झाला की जीवनात ताणतणाव वाढतात.सकारात्मक विचार माणसाला यशाच्या शिखरावर पोहचवण्यास नक्कीच हातभार लावतो.मेंदू जरी सारे निर्णय घेत असला तरी त्याला तसे करण्याची सूचना मनच देत असते.इच्छाशक्ती,भावना, जाणिवा, विचार, कल्पनाशक्ती यांसारख्या अनेक गोष्टी मनात सामावलेल्या असतात.अशा मनाबद्दल आपल्याला फार कुतूहल वाटत असतं.मनाची एकाग्रता आणि इच्छाशक्ती यांचा जवळचा संबंध आहे.जे करायचे ठरवले त्याच्यावर मन केंद्रित करून आपण यश नक्कीच मिळवू शकतो.अशक्य असं या जगात काहीच नाही.फक्त इच्छाशक्ती आणि मन यांची सांगड घालणं गरजेचं आहे.जेव्हा मन अस्वस्थ असते तेव्हा आपण केलेली कुठलीच गोष्ट बरोबर होत नाही.अशावेळी थोडावेळ शांत बसणे गरजेचे असते.
आपल्या मनाला नवीन नवीन गोष्टी शिकण्याची, आत्मसात करण्याची सवय लावून घेतली की आपल्या ज्ञानात भर पडत जाते.मनाने प्रथम श्रवण करावे आणि मग विचार मंथन करावे.कुणीही काहीही सांगितले म्हणून त्यावर लगेच विश्वासही करू नये किंवा ती गोष्ट झिडकारूनही टाकू नये.त्यावर आपले मन काय म्हणते,ते मनाला कितपत पटते ते ठरवून मग ते अंगीकारावे.कुणाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी, कुणाचे कौतुक करायला, मोडून पडलेल्याला सावरायला, विश्वासाने हाती हात घ्यायला मन मोठं असावं लागतं.हे सर्वांनाच जमतं असं नाही.
*************************
लैलेशा भुरे
नागपूर

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704