अंतरराष्ट्रीय प्रशिक्षक जॉन कार्लोस होलगाडो च्या धनुर्वीधा प्रशिक्षणासाठी : वृषाली पाटील जोगदंड यांची निवड
नांदेड दि: (संपादक राज गायकवाड) भारत सरकारच्या युवा व खेळ मंत्रालय अंतर्गत भारतीय खेळ प्राधिकरण व भारतीय धनुर्वीद्या संघटनेच्या वतीने बार्शीलोना ऑलम्पिक मध्ये धनुर्वीघेत सुवर्णपदक विजेते तथा आंतरराष्ट्रीय युनिव्हरर्सिटी स्पोर्ट्स फेडरेशनचे संचालक जॉन कार्लोस होलगाडो यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय धनुर्विद्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 4 ते 6 डिसेंबर 2023 दरम्यान भारतीय खेळ प्राधिकरण विभागीय प्रशिक्षण केंद्र सोनीपत साई येथे करण्यात आले असून त्यात प्रशिक्षणासाठी नांदेडच्या प्रशिक्षिका तथा सचिव वृषाली पाटील जोगदंड यांची निवड करण्यात आली आहे .
भारतीय धनुर्वीद्या संघटनेच्या अधिकृत प्रशिक्षकांसाठी या सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून त्यांना जॉन कार्लोस होलगाडो ( स्पेन) बार्शीलोना ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते तथा जागतिक धनुर्वीधा कोचेस कमिटीचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय धनुर्वीद्या प्रशिक्षकांच्या विकासासाठी हे शिबिर घेण्यात येणार असून प्रामुख्याने ऑलंपिक मध्ये खेळल्या जाणाऱ्या रिकव्हर प्रकारात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे .या शिबिरासाठी मराठवाड्यातून सर्वाधिक अंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय व राज्यपदक विजेते खेळाडू देणाऱ्या नांदेड जिल्हा संघटनेच्या सचिव वृषाली पाटील जोगदंड यांची भारतीय धनुर्वीद्या संघाने निवड केली असून त्यांचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते तथा राज्याचे महासचिव प्रमोद चांदूरकर आंतरराष्ट्रीय पंच ब्रिजेश कुमार ऑलम्पिक प्रशिक्षक श्री रविशंकर सर , महेंदसिंग सरदार , क्रीडा उपसंचालक विजय संतान , शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे , बाबू गंदपवाड डॉ .हंसराज वैद्य , उपायुक्त रमेश चवरे , उपाध्यक्ष मुन्ना कदम कोंडेकर , प्राचार्या एन सी अनुराधा श्रीनिवास भुसेवार , विक्रात खेडकर , प्राचार्य मनोहर सुर्यवंशी ,सुरेश तमलुरकर ,प्रवीण बोरसे , सहसचिव सोनल बुंदेले , पुनम महात्मे , प्रविण गडदे , अभिजीत दळवि , बाबूराव खंदारे ,बंटी सोनसळे ,गजानन फुलारी , शिवाजी पुजरवाड , माजी जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव ,अनंत बोबडे ,किशोर पाठक , विनोद गोस्वामी , डॉ. जयदिप कहाळेकर, प्रलोभ कुलकर्णी, संजय उदावंत, हाणमंत मुंगळे , पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर, कपील राऊत, अंतेश्वर कदम, अँड. शशिकांत जोंधळे, धोंडीबा मनसकरगेकर , राजेद्र सुगावकर ,सतिश कुमार जाधव , पंडीत कदम ,मालोजी कांबळे , दिपक कदम , याच्यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत