यशवंत मध्ये दि.२८ फेब्रुवारी रोजी युवक महोत्सवाचे उद्घाटन

‘यशवंत मध्ये दि.२८ फेब्रुवारी रोजी युवक महोत्सवाचे उद्घाटन
नांदेड:( दि.२७ फेब्रुवारी २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलीत यशवंत महाविद्यालयात दि.२८ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता यशवंत युवक महोत्सव:२०२५ चे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे कोषाध्यक्ष अँड. उदयरावजी निंबाळकर भूषविणार आहेत. याप्रसंगी विशेष उपस्थिती माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांची राहणार आहे तसेच प्रमुख अतिथी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाच्या उपायुक्त विद्या शितोळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.अनिल इंगळे आणि सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार आहेत. प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे आणि डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांची लाभणार आहे.
दि.१ मार्च ते ८ मार्च दरम्यान स्टुडन्ट पीपीटी सादरीकरण, पोस्टर सादरीकरण, मॉडेल सादरीकरण, काव्यवाचन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर गीत, शास्त्रीय संगीत या स्पर्धा संपन्न होणार आहेत.
दि ८ मार्च महिला दिनानिमित्त बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला आहे.
तरी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक डॉ.एम. एम. व्हि. बेग, समिती समन्वयक डॉ.नीरज पांडे, डॉ.संजय ननवरे, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.नीताराणी जयस्वाल, डॉ.श्रीकांत जाधव, डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, डॉ.अजय गव्हाणे आणि सदस्यांनी केले आहे.