जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी सेवानिवृत्त ; सेवानिवृत्ती निमित्त कर्मचाऱ्याचा यथोचित सत्कार

मानवत / प्रतिनिधी.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी श्री. माणिकराव बन्सीधरराव आरबाड व विठ्ठलराव डुकरे हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांचा ०६ ऑगस्ट रोजी मानवत शहरातील माऊली मंगल कार्यालय या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा व धोंडे जेवणाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून पाथरी विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. सुरेशरावजी वरपूडकर हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक दत्तराव मायंदळे, पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री. अनिलराव नखाते, भावनाताई नखाते, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राजेश दादा विटेकर, मा. शिक्षण सभापती श्री. दादासाहेब टेंगसे, मा. जिल्हा परिषद चक्रधर उगले, एकनाथराव शिंदे, माधवराव जोगदंड, माणिक आप्पा घुबरे, संजय काका रनेर, श्याम भाऊ धर्मे बँकेचे कर्मचारी मुखीद जहांगीरदार, पंडितराव विखे, मौचकर साहेब, दिपक गवारे, शाखाधिकारी पाथरी, सुदामराव सपाटे अरुणराव कोल्हे, मा. नगरसेवक आंनद मामा भदर्गे, सय्यद जमील हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागतसमारंभा नंतर मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त कर्मचारी श्री. माणिकराव आरबाड व श्री. विठ्ठलराव डुकरे यांचा शाल व श्रीफळ तसेच ग्रॅचुटी चेक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार श्री. सुरेशरावजी वरपूडकर यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्र माचे सूत्रसंचालन श्री. सदाशिव होगे यांनी केले तर आमदार सुरेशजी वरपुडकर यांनी कर्मचाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांना कसा देता येईल यासाठी प्रयत्न राहतील असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणा प्रसंगी सांगितले आहे. शेवटी आभार श्रीकृष्ण आरबाड यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश आरबाड, तुषार गजमल, ऋषिकेश ढगे, नरेंद्र नरवाडे, शुभम लाड, किरण हारकाळ, आदित्य चाफेकरडे, महादेव डुकरे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमास मानवत, पाथरी, सेलू सोनपेठ या तालुक्यातील नागरिक व बँकेचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
****