एम सी आर
Uncategorized

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये सात दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

नांदेड: प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने जागतिक योग दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दिनांक १५ जून ते २१ जून २०२६ या कालावधीत दररोज सकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आयोजित करण्यात येत आहे.


या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, कर्मचाऱ्यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना योग प्रशिक्षणासोबतच दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती, योग्य आहार, निरोगी जीवनशैली आणि जीवन जगण्याची कला यांसंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक कु. पूजा जमादार (पुणे) या शिबिरामध्ये प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार आहेत.
विशेष म्हणजे या शिबिरासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. तसेच शिबिरासाठी कोणतीही वयोमर्यादा नसल्याने इच्छुकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आयोजकांनी दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी डॉ. भास्कर माने, डॉ. राजपालसिंह चिखलीकर, डॉ. मरोती गायकवाड, डॉ. भिमा कंगळे, डॉ. कुलजितसिंह राणा आणि ठाकूर संजरसिंह यांच्याशी संपर्क साधावा.
विद्यापीठाच्या वतीने योगाच्या माध्यमातून निरोगी व संतुलित जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
—————————–

Share

Related posts

स्वामी विवेकानंद संकुलात रक्तदान शिबिराचे आयोजन

Chief Editor

श्री शारदा भवन हायस्कूल, अर्धापूर येथे डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

स्वामी विवेकानंद ‘क्षितिज-2026’ या वार्षिक स्नेहसंमेलनात तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

नीट पेपरफुटी प्रकरणाचा परिणाम; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

Chief Editor

जातीनिरपेक्ष व धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्व : डॉ.गौतम दुथडे* (-लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण यशवंतराव चव्हाण यांनी केली -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

Leave a Comment